मावशीने एकाच वेळी लेखन, दिग्दर्शन आणि भूमिका केल्या.. म्हणजे लहान मुलांच्या नाटकात लहान मुलांकडून भूमिका करून घेतल्या त्याच वेळी व्यवसायिक नाटकातून स्वतः भूमिका केल्या शिवाय शिकागोला शिकून आल्यामुळे नाट्यप्रशिक्षण शिबीर सुरु करून त्यातून बालनाट्यासाठी मुलं तयार केली हे सगळं काम एखादा द्रष्टा असावा या पद्धतीने तिने सुरु केलं होतं.
- विजय केंकरे
एकापेक्षा एक सरस ठरलेल्या त्यांच्या बालनाट्यात प्रभाव उत्कंठापूर्वक असं कथानक, डोळ्याचं पारणं फिटणार असं नेपथ्य, वेशभूषा आणि प्रकाशयोजना या सर्वानी बालप्रेक्षकांना आपलंस केलं होतं.
- कांचन सोनटक्के
व्यावसायिक रंगभूमी ही बालनाट्याला पूरक रंगभूमी म्हणून वापरली. ज्या ठिकाणी रात्री व्यवसायिक नाटके व्हायची त्याच ठिकाणी आमचे बालनाट्याचे प्रयोग व्हायचे. आमच्या बालनाट्याला व्यावसायिक दर्जा असायचा.
- कमलाकर नाडकर्णी
मिशनरी बायकांना, नर्सेसना ' सिस्टर ' म्हणतात. त्या बालरंगभूमी मिशनप्रमाणे चालवत राहिल्या म्हणून त्यांना ' ताई ' म्हणतात का ?
बालरंगभूमीवर त्यांना केवळ मनोरंजन करणारी उथळ, सवंग बालनाट्य आणली नाहीत, मुलांच्या मनावर चांगले संस्कार करण्याचा मुख्य हेतु त्यांनी मनात बाळगला म्हणून त्या कायम ताई राहील्या.