आयुष्यभर कवीधर्म हाच स्वधर्ण मानणारा सुधीर एका क्षणी कविता लिहू लागला आणि मग लिहीतच राहिला काळाच्या ओघात अनेक क्षेत्र, माध्यमं समोर येत गेली या सर्वांच्या अनेकानेक वेगळ्या भूमिका आणि धर्म होते. पण त्यात त्याचा कवीचा मूळ पिंड कधीच हरवला नाही या स्वैर भटकंतीत कधी तो कवी-गीतकार झाला, कधी कधी- संगीतकार, कधी कवी-गायक, कवी-सादरकर्ता तर कधी कवी- दिग्दर्शकही. अलीकडे या कवीधर्माबरोबरच एका 'रंग-चित्रधूननं' त्याचं संपूर्ण अस्तित्व आणि व्यक्तित्व झपाटून टाकलं होतं. पण तरीही या सगळ्या चित्रांमध्ये कुठेतरी त्याची कविताच एक वेगळ रूप लेवून येत होती
सुधीर मोघे नामक कलंदर आणि मनस्वी कवीच्या या लेखनाचं मूलभूत सूत्र कविता हेच आहे. पण रूढ सांकेतिक अर्थानं, ते केवळ कवितेपुरतंच मर्यादित नाही. तर कवितेच्या बहुरूपी विश्वाचा, एकूण जगण्याच्या आणि त्यामुळे स्वतःच्याही थोडं आत उतरण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
आयुष्यभर कवितेशी इमान राखणाऱ्या एका स्वच्छेद पण अत्यंत मनस्वी कवीचं हे गाजलेल, लोकप्रिय सदर जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याला भरभरून साथ देणारी त्याची 'कविता सखी'...