बहेणाबाई रत्नाकरपंत पाठक या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिष्या. त्यांचा कालखंड सन १६२८ ते १७०० असा मानला जातो. वयाच्या तिसऱ्या वर्षी बिजवर असलेल्या तीस वर्षांच्या रत्नाकरपंत पाठकांशी त्यांचा विवाह झाला. आठव्या वर्षापासून आई-वडील, बंधू व पती यांच्या समवेत भटकंतीचे यातनामय आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. पांडुरंगाची भक्ती व संत तुकाराम महाराजांवर दृढ निष्ठा हेच त्यांच्या जगण्याचे श्रेयस होते. त्यांना मागील तेरा जन्मांचे ज्ञान होते. त्यांना परमार्थाची ओढ होतीच. सद्गुरुकृपेने त्यांनी एकंदर ७००-७२५ अभंगांची रचना केली. शेवटी शिऊर, ता. वैजापूर येथे त्यांनी समाधी घेतली.
संत बहेणाबाई यांचा हा जीवनप्रवास थक्क करणारा, प्रेरणादायी, भक्तिमार्गाची कास धरणारा आहे. 'देवलसी संत बहेणाबाई' या डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर यांच्या कादंबरीतून त्या प्रवासाचा सुंदर अनुभव येतो. तो एकदा तरी सर्वांनी वाचावा असाच