नईमाला अल्पनाचित्रांची खूपच आवड होती. अल्पनाचित्र म्हणजे बांगलादेशातील एक पारंपरिक चित्रकला. नईमाला अल्पनाचित्रांच्या स्पर्धेत बक्षीसंही मिळाली होती.
पण कायम चित्रांचा विचार करणाऱ्या नईमाच्या मनात आता आपल्या थकलेल्या वडलाना मदत करण्याचे विचार घोळत होते.
तिचा मित्र सलीमही पैसे मिळवून वडलांना मदत करू लागला होताच पण तो मुलगा होता आणि नईमा मुलगी.
पण नईमाने त्यावरही मार्ग शोधलाच....
मूळच्या कोलकात्याच्या असलेल्या मिताली पर्किन्स सध्या न्युटन, मॅसॅचुसेट्स येथे राहतात.