सुधा मूर्तीनी लिहिलेल्या बालकांचं हे पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत.
नेहमी लबाडपणा करणाऱ्या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणाऱ्या अनेक स्त्रिया पहायला मिळतील.
जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.