छोट्या कृतीतूनच होते मोठ्या बदलाची सुरुवात प्रत्येकालाच जीवनात काही बदल घडवून आणायचे असतात. लोक तसा प्रयत्नही करतात. काही प्रमाणात बदल घडवतातही. पण ते बदल तात्पुरतेच असतात. पण मिनी हॅबिटस्च्या या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारे स्वतःच्या मनाविरुद्ध न जाता आपण जगातल्या या महान गोष्टी साध्य करू शकतो विशेष म्हणजे त्यासाठी स्वतःवर जबरदस्ती करण्याची अजिबात गरज नाही. मिनी हॅबिट ही एक अशी छोटीशी कृती आहे जी रोज करण्यासाठी तुम्ही स्वतःला सहज प्रवृत्त करू शकता. छोटी सवय ही बाबच अतिशय छोटीशी असल्यामुळे त्यात अपयश येण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आचरणात आणण्यासाठी साहजिकच हलकी-ङ्गुलकी पण अतिशय शक्तिशाली असते. म्हणूनच चांगल्या मिनी हॅबिटस् निर्माण करणे हा एक सोपा आणि उत्तम मार्ग आहे. जो तुम्हाला या पुस्तकातून मिळेल