![Swa-Sanwad Ek Jadu [Marathi Edition] by Sirshree](http://bestofusedbooks.com/cdn/shop/files/1_f5746478-ac97-4dda-9bf0-172ecffad562_{width}x.jpg?v=1741926604)
कोणी आपली प्रशंसा केली आणि म्हटले, 'तुम्ही होता म्हणून काम झाले नाहीतर हे काम होणे शक्यच नव्हते.' अशाप्रकारे आपली स्तुती झाली तर काय होईल? अशा वेळी अनेकांना रात्रभर झोप येत नाही. त्यांना ते प्रशंसनीय बोल वारंवार आठवतात. 'कशी माझी प्रशंसा झाली..., कसे सर्वजण मला चांगले म्हटले....' हा मनातील स्वसंवाद थांबतच नाही.
एखाद्याने जर आपली चूक दाखविली तर ते आपल्याला त्रासदायक ठरते. कोणी आपली निंदा केली तर आपल्याला वाईट वाटते. आपण स्वतःच आपला रिमोट इतरांच्या हाती देवून त्यांच्याकडून ही अपेक्षा बाळगतो की, 'त्यांनी रागाचे नव्हे तर प्रशंसेचे बटण दाबावे.'