रंग २
कमल देसाई
'रंग-२' मधील कथा पुढल्या काळातल्या, आधुनिक आणि आधुनिकोत्तरता ह्यांमधील संवेदना, दोलायमानता, संक्रमणावस्था ह्यांचे प्रातिनिधिक चित्रण करणाऱ्या, भव्य तसेच मर्मग्राही वाटतात. त्यांतील संदिग्धता, धूसरता, विसंगती, आंतरविरोध हे सारेच काही विशिष्ट निर्णयांच्या पोटी आलेले दिसतात.
मराठी साहित्यात स्थिरावू पाहणारा 'बीभत्स गारठा' वितळविण्याचे सामर्थ्य असणाऱ्या ह्या कथांना नव्या पिढीतील चिकित्सक वाचकवर्ग लाभो हीच सदिच्छा.