तिला आशीर्वाद देताना, तिच्या मस्तकावर हात ठेवून त्यांनी उद्गार काढले, "आज साऱ्या देशाला तुझा अभिमान आहे. तुझ्या माता-पित्यानी तुला उत्कृष्टरित्या घडवीले आहे." हे उद्गार जेव्हा या महान व्यक्तिच्या मुखातून ऐकले तेव्हा 'आई' म्हणून सारे जग जिंकल्याचा आनंद झाला. जणू आजवरच्या साऱ्या कष्टांचे सार्थक झाल्याचा प्रत्यय आला. आदरणीय राष्ट्रपतींचा परीसस्पर्श लाभलेली माझी 'मनाली' आज अजिंक्यतारकाच झाली होती. आमच्यासाठी हे सोनेरीक्षण हसत हसत आले