हे रानफूल आहे!
स्वच्छंदतेचा दिमाख मिरवणारे... स्वतः जोपासत स्वतंत्र वाढलेले...
या रानफुलाला गुलाबाचा सुगंध किंवा कमळाच्या सुंदरतेशी तुलना नकोच आहे. त्याचा डौल, दिमाख आणि प्रसन्नतेची व्याख्या मोकळेपणाशी सलगी करणारी आहे...
इतर फुलं मिळतील की तुम्हाला सुंदर सजवलेल्या दुकानांमधून आणि चकचकीत आकर्षणाच्या वेष्टनांमधून, पण, या रानफुलांची धुंदी अनुभवयाची असेल तर, मात्र अनवट वाटाच धुंडाळायला लागतील...
डॉ. संदीप अवचट