रामराज्य दोन विभागात प्रकाशित करण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याची पृठसंख्या. ती एक्का पुस्तकात बांधणं तुमच्या दृष्टीनं गैरसोयीचं झालं असतंसं वाटतं. अर्थात त्या निमित्ताने मला थोडी अधिक विवं सामावून घेता आली, रोमराज्य दृश्य स्वरूपातही तुमच्यापर्यंत पोहोचवताना त्यांची निश्चितच मदत होईल.
पुस्तकाच्या पहिल्या खंडात पुरातन रोमन साम्राज्य सविस्तर आलं आहे तर या खंडात मध्ययुगानंतरची इटली विशेष दिसेल. नेपल्सच्या दक्षिणेला आणि एकूणच इटलीच्या पूर्व किनाऱ्यावर, व्हेनिसचा सणसणीत अपवाद वगळता पर्यटकांचा राबता फार कमी, तिकडे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थाही जेमतेम. फिरण्याची स्थळं दूर दूर विखुरलेली. तो पाहायची असल्यास खाजगी वाहनाखेरीज गत्यंतर नव्हतं. तेव्हा हा भाग स्वत: गाडी चालवत पाहताना
अनुभवही वेगळे आले. त्यांची मजा वेगळी. पुस्तक एकच असल्याची पुन्हा एकदा आठवण करून देऊन दोन्ही भाग क्रमानं वाचले जातील अशी अपेक्षा आहे.
त्यांत इटलीबद्दलची तुमचीही अपेक्षा पूर्ण होईल अशी आशा करते.