Manus'Ki' [marathi edition]
दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन. या भ्रमंतीदरम्यान समाजातील विविध स्तरांवरील लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर समाजमनाला जागृत करण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. समाजातील दुःख दूर करण्यासाठी ज्या व्यक्तींनी स्वबळावर काही वेगळे केले आहे, अशा आनंददूतांनी घडवलेल्या परिवर्तनाची कथा सांगणारे हे पुस्तक - 'माणूस की'. लेखक संदीप काळे यांच्याबद्दल सकाळ युथ यिनबझचे संपादक म्हणून मुंबई येथे कार्यरत. पत्रकारितेतील दीर्घानुभव. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव इत्यादी अनेक पुरस्कारांचे मानकरी. आजवर २१ पुस्तके प्रकाशित. भ्रमंती लाईव्ह सदरामुळे विशेष ओळख.