डेल कानेंगी ह्यांच्या सहा लाख बेस्टसेलर्स कॉपीज नुकत्याच सुधारित स्वरूपात प्रकाशित झाल्या, लाखो लोकांना आपल्या चिंता करण्याच्या सवयीतून मुक्तता मिळाली. डेल कानेंगींनी १९९० साली आपल्याला व्यवहारिक पातळीवर आचार विचारांची जी सूत्रे सांगितली होती ती आज सुद्धा तेवढीच उपयुक्त आहेत.
तुमच्या व्यवसायासंबंधीच्या पन्नास टक्के चिंता तुम्ही ताबडतोब कमी करू शकता.
तुमच्या आर्थिक चिंता तुम्ही मिटवू शकता.
'निंदकाचे घर असावे शेजारी' ह्या उक्तीप्रमाणे टिकेचा फायदा करून घ्या.
दमणूक टाळा आणि चिरतरूण दिसा.
तुमच्या जागृतावस्थेतच एक तास अधिक मिळवा आणि स्वतःला जाणून घ्या, स्वतः म्हणून जगा.
लक्षात ठेवा ह्या पृथ्वीतलावर तुमच्या सारखे दुसरे कोणीच नाही.
'चिंता सोडा सुखाने जगा' हे पुस्तक मुलभूत मानवी भावना आणि विचार ह्यांना हळुवारपणे हाताळते. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव आहे. यातील सूचना आचरणात आणणे फार सोपे आहे. असे करण्याने तुमच्यात अमुलाग्र बदल होईल. एवढेच नाही, तर तुम्ही अधिक उच्च प्रतीचे आयुष्य जगाल. ज्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य पूर्णत्वाने आणि आनंदाने जगू शकणार नाही, असे चिंतांनी आणि काळज्यांनी भरलेले आयुष्य जगण्याची काय गरज आहे?