चिनी पोलीस जिआनचं आयुष्य तसं निवांत चाललेलं असतं. मुलगी दूरदेशात इंग्लंडमध्ये शिकत असते. फोनवरून तिची विचारपूस केली की, तो कर्तव्यातून मोकळा, असं त्याला वाटत असतं. पण अचानक एके दिवशी जिआनला त्याच्या लेकीचा फोन येतो – बाबा मला वाचवा, प्लीज मला वाचवा! आणि जिआनचे डोळे उघडतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीचा शोध घ्यायलाच हवा असा तो निश्चय करतो खरा; पण त्याचा या शोध त्याला नेतो त्याने कधीही कल्पना न केलेल्या, भयंकर गल्ल्या-बोळांमध्ये..तिथे जिआनला भेटतो, अवैधरीत्या इंग्लंडमध्ये आलेला चिनी कामगार – डिंग मिंग. तो अस्वस्थ असतो, कारण त्याच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीशी त्याला बोलायचे असते आणि त्यासाठी त्याचा पोिंशदा त्याच्याकडे नसत्या मागण्या करत असतो. त्याला आपल्या तालावर नाचवू पाहत असतो..दोन अस्वस्थ पुरुष, निष्ठुर गुन्हेगारांच्या टोळ्या आणि इंग्लंडमधील अधोविश्वाची गुंतागुंतीची; अस्वस्थ करणारी थरारकथा!