हे केवळ पुस्तक नाही, तीस वर्षे अथकपणे केलेल्या प्रयोगशिल अध्यापन मुशाफिरीचे मंथन आहे. व्याख्यानांच्या निमित्ताने असंख्य विद्यालय - महाविद्यालयातील विद्यार्थी व अध्यापकांच्या भेटीगाठीतून, प्रत्यक्ष अध्यापन व्यवसायातून केलेल्या असंख्य कल्पक प्रयोगातून हाती गवसलेले हे सार आहे.
ह्या भटकंतीत अनेक जिद्दी विद्यार्थी, अध्यापक व पालक प्रवीण दवणे यांना भेटले- त्या भेटीगाठीचे सृजनशिल निष्कर्ष यात आहेत.
म्हणूनच हा जिव्हाळ्याचा हृदयसंवाद पालक-शिक्षक व विद्यार्थीमित्र साऱ्यांसाठीच आहे...
पिढी घडवू इच्छीणाऱ्या प्रत्येकासाठी !