'मंगल पांडे'चं शूटींग संपलं होतं आणि 'रंग दे बसंती' चं भूटींग सुरू होणार होतं, त्या दरम्यानच्या काळात, म्हणजेच साधारणपणे २००४ मध्ये माझं वजन भलतंच वाढायला लागलं होतं, नाही नाही म्हणता भी पंच्याऐंशी किलोचा टप्पा गाठला होता. माझ्या ५.७" उंचीच्या मानाने एवढं वजन खूपच जास्त होतं. त्या वेळी माझ्या शरीरातल्या चरबीचं प्रमाण होतं पस्तीस टक्के, हे काही चांगलं लक्षण नव्हतं, आणि वजन उतरवण्यासाठी मला योग्य मदतीची नितांत गरज होती. त्याच सुमारास डॉ. विनोद धुरंधर यांच्याशी माझी पहिली भेट झाली.
Status
Active
डॉ. धुरंधरांच्या सल्ल्यामुळे केवळ सहा महिन्यांत माझं वजन सत्तर किलोपर्यंत खाली उतरलं, डॉक्टरांची भेट आणि त्यांनी दिलेलं डाएट हा माझ्यासाठी जणू पुनर्जन्मच होता. त्यांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या आहारामुळे माझं वजन आणि चरबी तर कमी झालीच, शिवाय माझं आरोग्यही सुधारलं. सध्या माझं वजन आहे सत्तर किलो आणि शरीरातल्या चरबीचं प्रमाण अवघं बारा टक्के त्यामुळे मला खूपच छान वाटतं.