असीम कौर्य, दुर्दैव आणि बेचिराख सृष्टी... पूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही बाळगली जाणारी उद्याची आशा, चांगुलपणाः ऑणि त्यातज्ञ निर्माण होणाऱ्या माणुसकी आणि ईश्वरी श्रद्धेविषयीच्या प्रश्नांची तात्त्विक मीमांसा करणारी वैचारिक कादंबरी.
बेचिराख झालेल्या अमेरिकेतून एकटेच वाट काढत दक्षिणेकडे मार्गक्रमण करणारे वडील आणि त्यांचा लहान मुलगा. वाऱ्यावर उडणाऱ्या राखेशिवाय त्या उजाड प्रदेशात कसलीही हालचाल नाही. रस्त्यावर पाळत ठेवून असलेल्या लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांच्याजवळ एक पिस्तूल, अंगावरचे कपडे, इकडून तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक कार्ट; आणि एकमेकांशिवाय काहीही नाही.