शतकातून असं एखादंच पुस्तक लिहिलं जातं, जे तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकतं. संपूर्ण अमेरिकेत छोट्याछोट्या दुकानातून हे पुस्तक दिसू लागल्यापासून या हातातून त्या हातात, एक मित्राकडून दुसर्या मित्राकडे जात राहिलं. ‘द सेलेस्टाईन प्रोफेसी’ ही नवीन उमलणार्या जाणीवांची कथा अतिशय पकड घेणारी आहे. ही साहसकथा आपल्याला पेरू देशातील प्राचीन हस्तलिखितं व त्यांत दडलेली आध्यात्मीक सत्यं यांच्या शोधार्थ घेऊन जाते. या प्रवासाला आरंभ होताच तुमच्या लक्षात येईल की, हे विलक्षण पुस्तक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदशर्क आहे. आयुष्याच्या या वळणावर तुम्ही आता का आहात, याचा खोल अर्थ तुम्हाला उलगडू लागेल. नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता भरून घेऊन तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.