![Pravaas Jagaachaa Jagnyachaa by Veena Patil [Marathi Edition]](http://bestofusedbooks.com/cdn/shop/files/bcn_{width}x.jpg?v=1742187996)
We may run, walk, stumble, drive or fly;
but let us never loose sight of the reason for the journey or miss a chance to see a rainbow on the way.
... प्रवास... जगाचा असो किंवा जगण्याचा !
enter
- Anonymous
आपलं उद्दिष्ट निश्चित करावं अन् प्रवासाला निघावं. संपूर्ण सफरीत त्या उद्दिष्टाचा विसर पडू न देता मानवी स्वभावाचे असंख्य कंगोरे अनुभवावेत. वाटेत अडचणी येतीलही. त्यावर मात करायचीच. पण त्या गडबडीतही अवचित समोर आलेल्या इंद्रधनुष्याचं सौंदर्यही टिपायला हवंच. हे पथ्य पाळलं तर कोणताही प्रवास आपल्यासाठी एक अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभव ठरेल.
हजारो पर्यटकांना देशविदेशातील रमणीय ठिकाणांची सफर घडविणाऱ्या 'केसरी' च्या वीणा पाटील यांच्या अनुभवविश्वाची ही रंगतदार सफर !
त्यांच्या या लेखनप्रवासात आपल्याला भेटतात अनंतरंगी मानवीस्वभाव अन् उलगडत जातात
आठवणींच्या लडी.
खुसखुशीत अन् हलके-फुलके किस्से ऐकत आपण या वाटचालीत रमतो... तरीही या अनेकविध विषयांतून समोर येतं एकच सूत्र-आनंददायी प्रवासाचं जगाच्या आणि जगण्याच्याही !
ही आठवणींची, स्मरणरंजन घडविणारी सफर आपल्यालाही जीवनाच्या प्रवासाला सकारात्मक दृष्टीनं समोरं जाण्याचा जणू मूलमंत्रच देते.