Prashna Tumche Uttar Tenali Ramanche [Marathi edition]

Prashna Tumche Uttar Tenali Ramanche [Marathi edition]

Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

तेनाली रमण राजदरबारातील विदूषक होता. तो एक विद्वान सल्लागारही होता. कर्नाटकातल्या विजयनगर साम्राज्याचे प्रसिद्ध सम्राट कृष्णदेवरायांच्या (१५०९-१५२९) भुवन विजयम् राजदरबार) मधील अष्टदिग्गजांपैकी (आठ दिशांची धुरा वाहणारे आठ हत्तींचे स्तंभ) एक दिग्गज होता सम्राट अशोक, समुद्रगुप्त आणि हर्षवर्धन यांच्यासारख्या पराक्रमी आणि जनहितदक्ष राजांच्या पंक्तीत बसणारे महाराज कृष्णदेवराय एक आदर्श राज्यकर्ते होते. तेनाली रमण तीक्ष्ण बुद्धी, चातुर्य आणि नर्म विनोद यांचे मूर्तिमंत उदाहरण होता. ज्ञान, धूर्तपणा आणि कल्पकता यांचे कौतुकास्पद मिश्रण असलेला कवी होता. तेनाली रमणच्या छोट्याशा कारकिर्दीचा वारसा भारतीयांसाठी अनंतकालची शिदोरी बनला, रसरशीत आख्यायिका, दंतकथा आणि बोधकथांच्या या संग्रहात तनालीच्या या सर्व गुणांचा विस्ताराने शोध घेतलेला असून, ते गुण वाचकांसमोर मांडलेले आहेत. * पुस्तक तेनाली रमण आणि महाराज कृष्णदेव यांच्या दंतकथांचा अद्भुत खजिना आहे. यातील कथा अलीकडच्या इतिहासाच्या धुक्यात हरवलेल्या भारतभूमीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संस्कृतीच्या स्मृती जागृत करतात. सावध आणि चलाख प्रज्ञावंत, शिताफीने समोरच्याला टोपी घालणारे उडाणटप्पू गप्पिष्ट, धारदार जिभेचे धूर्त आणि लुच्चे, धाडसी लुटारू, बहुरंगी आणि बहुढंगी

मामान्यांचा असामान्य समूह, या साऱ्यांची झलक या संस्कृतीत प्रतिबिंबित होते. लेखकाने ओघवत्या भाषेत कथन केलेल्या आणि उत्कृष्ट रेखाचित्रांनी सजवलेल्या 'फिक्स युवर प्रॉब्लेम्स - द तेनाली रमण वे' या पुस्तकातील कालातीत संकल्पना, व्यावहारिक शहाणपणा आणि फसफसणारा विनोद यांच्या बेमालूम मिश्रणाने वाचकांना खिळवून ठेवतात. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी मुद्देसूद नीतितत्त्वे आणि अपरिमित किस्से पेरलेले आहेत. गोष्टींचे मर्म नीटपणे समजून घ्यायला त्यांचा माचितच उपयोग होतो. प्रत्येक गोष्ट संकटांना तोंड देणारे आणि कसोट्यांना यशस्वीपणे उतरणारे पारंपरिक अर्थगर्भ शहाणपण वाचकांपर्यंत पोहोचवते. या कथांमधून कौशल्याने अधोरेखित केलेल्या नीतीच्या कल्पनांची खासियत अशी, की त्या विवेकी वाचकांच्या मनावर अनेक अंगांनी उसे उमटवतात आणि त्यांच्या मनातल्या विसविशीत विचारांना नेमकं स्वरूप देण्यास सहाय्य करतात.

तमच त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात यशाचं शिखर गाठवण्यास उद्युक्त करतात. शिक्षण, माहिती, आदेश,

प्रोत्साहन आणि प्रेरणा देणाऱ्या तसंच करमणूक करणाऱ्या विविध पापुद्रयांनी या पुस्तकाचे अंतरंग

सजलेले आहे. संधी आणि शाप यासारख्या विरोधाभासाने भरलेल्या या जगात जगण्याच्या शर्यतीत

ज्या महत्वाकांक्षी व्यक्तींना पुढे राहायचे असेल, त्यांच्यासाठी हे मार्गदर्शक पुस्तक अतिशय मोलाचे

आहे परकीयांच्या आक्रमणापूर्वीचा भारतखंडासारखा पूर्वेकडील देश युगानुयुगे चालत असलेल्या

विविध विषयातील ज्ञान आणि शहाणपणाच्या थक्क करणाऱ्या दिमाखदार वैभवाने मिरवत होता. या

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods