![Papilaan [marathi edition]](http://bestofusedbooks.com/cdn/shop/files/wewewi_{width}x.jpg?v=1738929911)
पॅपिलॉन
साहित्य नव्या जाणिवांनी परिपूर्ण होऊ लागल्यानंतर, एका नव्या जगाची ओळख करून देणारे सरळ, ओघवत्या, पण सामर्थ्यवान शब्दातील जिवंत अनुभवांचे सत्यदर्शन 'पॅपिलॉन' मध्ये घडते.
जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीरसंपदा या दोन दैवी देणग्यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो, हे 'पॅपिलॉन' वरून समजेल.
'पॅपिलॉन' म्हणजे फुलपाखरु. हेन्री शैरियरचे गुन्हेगार जगतातील ते टोपण नाव. त्याचा जन्म १६ नोव्हेंबर १९०६ रोजी दक्षिण फ्रान्समधील 'आर्डिक' या गावी झाला. थोड्याच अवधीत त्याने शहरातील गुन्हेगार जगामध्ये महत्त्वाची जागा मिळवली. पुढे पोलिसांच्या कारवाईला बळी पडून, मनुष्यवधाच्या खोट्या आरोपाखाली त्याला जन्मठेप झाली. सात वेळा पलायन करण्याच्या प्रयत्नात आलेल्या अनुभवांचे हे चित्रण. ८ वे यशस्वी पलायन केल्यानंतर त्याने हे पुस्तक लिहिले. जगातील सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्या पुस्तकाची स्तुती केली आहे.