समाजवादी पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांच्या सहवासात येतो त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सतत शिकण्याचा प्रयत्न करतो त्यांचे प्रेम व विश्वास संपादन करतो सर्व समाजवादी व प्रगतिशील परिवारात हवाहवासा वाटणारा एक सेलिब्रेटी होतो एखाद्या तथाकथिक विद्वानाला लाजवील इतके अफाट वाचन चिंतन मनन करून वैचारिक क्षेत्रात प्रगल्भता प्राप्त करतो सुरुवातीच्या आयुष्यात गरिबीचे दाहक चटके सहन करूनही पुढील आयुष्यात कसलीही कटुता न बाळगण्याची खबरदारी घेतो कमी शिक्षण असल्यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊ न देता सार्वजनिक जीवनात प्रचंड आत्मविश्वासाने वावरतो लोकशाही मूल्याची जपणूक करण्यासाठी पाच वर्षांचा एक मुलगा असताना १९७५ साली देशातील राजकीय आणीबाणीविरूध्द सतरा महिने तुरूंगात जातो पन्नास वर्षांच्या अथक कृतिशील जीवनात प्रत्येक वेळी वैचारिक व रस्त्यावरील संघर्षात उपेक्षितांच्या बाजूने उभा राहतो आणि लोकशाही समाजवादी राजकारण हीच आपल्या जीवनाची मूलभूत प्रेरणा मानतो खडसांचा हा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे