हे पुस्तक म्हणजे पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचे आत्मचरित्र आहे. राजलक्ष्मी भोसले यांचे शालेय जीवन ते महापौरपद इथपर्यंतचा आयुष्याचा लेखाजोखा प्रस्तुत पुस्तकात आला आहे. लेखिकेच्या सामाजिक, राजकीय प्रवासाचे प्रांजळ आत्मकथन हे या पुस्तकाचे स्वरूप आहे. अतिशय लालित्यपूर्ण आणि मनमोकळ्या भाषेशैलीद्वारे राजलक्ष्मी भोसले या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण प्रवास आपल्यासमोर उलगडत जातो. जीवन हे खर्या अर्थाने ‘व्हीजन’ होणं म्हणजे काय? हे जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे हे पुस्तक आहे.