कालिंदी !
'नर्मदेऽऽ हर हर', 'साधनामस्त' आणि 'नित्य निरंजन' या वेगळ्या मालिकेतील श्री. जगन्नाथ कुंटे यांचा चौथा अनुभूती-ग्रंथ.
'स्वामी' आणि पूर्वाश्रमीची त्याची पत्नी 'कालिंदी' आणि त्या अनुषंगानं अनेक साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी..
संन्यास न घेता संन्यस्त वृत्तीनं जगताना समाजाला मार्ग दाखविणारी 'कालिंदी'.. याचं चित्रण करतानाच स्त्री आणि एकूण समाज यांच्या सद्यस्थितीचं आणि आदर्श स्थितीचं परखड चिंतन लेखक करतो...
एका स्त्रीनं गाठलेल्या खऱ्या आध्यात्मिक उन्नत्तीचा हा प्रवास वाचणाऱ्यालाही प्रेरणा देतो..
प्रकाशाचा मार्ग दाखवतो...