अंधाऱ्या खोल्यांमधून आपलं प्रशासक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, आपल्या श्रेष्ठ कर्तव्याचं देशासाठी अंमल करणाऱ्या युवकांसाठी, प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, मैत्रीवर खरं निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांसाठी, नात्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांसाठी, बदल घडवणाऱ्या प्रत्येकांसाठी, माझ्या सर्व युवा अधिकाऱ्यांसाठी, संघर्ष ज्यांचा पिंड आहे त्या सर्वांसाठी, हे पुस्तक अर्पण आहे.. अगदी थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक म्हणजे स्वप्ने, प्रशासनातील जबाबदाऱ्या, कर्तव्य, एक प्रेमळ प्रेम कथा, आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये असणाऱ्या छुप्या नायकाबद्दलचे रहस्य आहे. स्वागत आहे अशा युवकाचे, एका २५वर्षाच्या युवा अधिकाऱ्याचे, ज्याने २५ वर्ष अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी धाडसी पाऊले उचलली....