![First June Child (फर्स्ट जून चाईल्ड) by Dr. Yashvant Ingale [Marathi Edition]](http://bestofusedbooks.com/cdn/shop/files/jddjjdj_{width}x.jpg?v=1742016309)
जिद्दीचा प्रेरक जीवनप्रवास ! बालपणीच्या अपार कष्टातून माणसे उभी राहतात. स्वतःच्या जीवनाला शिल्पासारखा आकार देतात, अन् स्वतःला घुमटाकार देता देता इतर जिद्दी स्त्री-पुरुषांनांसुद्धा एक प्रकारे लढण्याची प्रेरणा देऊन जातात. डॉक्टर यशवंत इंगळे यांचे आत्मचरित्र याच चाकोरीतून प्रवास करणारे आहे. साखरवाडीच्या एका सामान्य कामगारपुत्रापासून ते पिंपरी-चिंचवडमधील आपल्या दंतवैद्यक शास्त्रातील अपूर्व संस्थेपर्यंतचा त्यांचा प्रवास जितका मनोरंजक आहे, तितकाच तो इतरांना प्रेरक ठरावा असा आहे. निश्चितच डॉक्टर इंगळे यांचे जीवन, लेखन आणि त्यांनी आपल्या दंतवैद्यकशास्त्रात काम करताना जपलेली सचोटी व रंजल्या गांजलेल्यांसाठी त्यांच्या उरात वाहणारा माणुसकीचा झरा सर्वांसाठीच आदर्शवत ठरेल. - विश्वास पाटील (लेखक) आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देताना भावाकडून मिळालेल्या सहकार्यापासून ते दंतशल्यविशारद होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास फारच लक्षवेधी आहे. वाचताना त्यामध्ये आपण हरवून जातो. डॉक्टरांनी 43व्या वर्षी मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळालेला प्रवेश, तो मिळवण्यासाठी करावी लागलेली खटपट, शिक्षणासाठी चढावी लागलेली कोर्टाची पायरी, वयाच्या 56व्या वर्षी मिळवलेली पीएच. डी. या प्रसंगाच्या बरोबरच विशेष म्हणजे दंतशल्यविशारद असतानादेखील, केवळ प्राणिमात्रांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी कॅन्सर झालेल्या कुत्र्यावर केलेली शस्त्रक्रिया, जबडा तुटलेल्या मांजराचे वाचवलेले प्राण, हे अनुभव वाचताना येणारा अनुभव विलक्षण आहे. वेगळ्या धाटणीची असणारी ही बायोग्राफी खूपच छान झाली आहे. - सयाजी शिंदे (अभिनेता)