२१ एप्रिल, २००९ सद्यस्थितीत बिनतारी यंत्रणा, पाणी, अन्न आणि वैद्यकीय उपकरणं या सगळ्याचीच येथे कमतरता आहे. या असल्या मोहिमांमध्ये मनुष्यबळाची नेमकी उणीव असते. अत्यंत धोकादायक भागांत दोन आठवडे पुरेल इतवंâच पाणी, अन्न आणि वैद्यकीय सामग्री घेऊन एखाद्या प्लॅटूनला पाठवणं, हे अगदी लाजिरवाणं आहे. ज्या दुखापती होतील त्यावर मी औषधोपचार करूच शकणार नाही आणि सैनिकांचे बळी जातील. खरंतर ते टाळता येऊ शकतील. हे म्हणजे आम्ही डोंबाNयासारखं दोरावरून चालणंच आहे. योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आम्ही दोरावरून पडण्याची शक्यताच जास्त! भिंतीवर डोवंâ आपटून घेण्यासारखंच आहे हे! मला हे सगळं फारच भयानक वाटतंय; म्हणजे इतवंâ की, भीतीनं मी आजारीच पडेन. आज रात्री मी मॉमजवळ हे सगळं बोलेन आणि त्यानंच कदाचित मला थोडा उत्साह येईल.... – लेफ्टनंट मार्वâ एव्हिसन