![Chaukatibaher (चौकटीबाहेर) by Vinta Kulkarni [Marathi Edition]](http://bestofusedbooks.com/cdn/shop/files/VintaKulkarni_{width}x.jpg?v=1742018217)
१९६० च्या आसपास मराठी माणसाने अमेरिकेत स्थलांतर करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या दोन-तीन पिढ्या अमेरिकन जीवनात मिसळून गेल्या आहेत. या नवीन पिढीचे मराठीशी नाते मायभूमीच्याही पुढे म्हणजे आजी भूमी असे आहे. विनताच्या काही कथांमध्ये उल्लेख असलेले संमिश्र विवाह नवीन पिढीतील मराठी माणसांना त्यांच्या अमेरिकेतील मुला-मुलींमुळे अपरिचित नाहीत. अमेरिकन पार्श्वभूमी असलेल्या या कथांमधील नायिका खंबीर आहेत. वेळ पडली तर, अमेरिकेच्या अस्थिर व्हिसाची वाट पाहत, स्वतःच्या उच्चशिक्षणाचा उपयोग न करता आल्यामुळे, सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये परावलंबी जीवन जगण्याऐवजी वेगळे निर्णय घेणाऱ्या आहेत. 'चौकटीबाहेर' या नावाला शोभेल अशा वेगळ्या कथा वाचकांना भावतील अशी आशा आहे. विनता यांच्या अकाली निधनामुळे या कथासंग्रहात त्यांनी योजलेल्या काही कथा राहून गेल्या आहेत.