पालक, मुले आणि अभ्यास, त्यांची मानसिकता यांच्यातील प्रत्येक गोष्टीचा विचार मुलांची स्फोटक वृत्ती, अभ्यासाचा गुंता, भयाचा डोह यामध्ये पालक आणि मुलांच्या मधील संवादाचे महत्त्व सांगून त्यांच्यामधील बुजरेपणाचा पडदा बाजूला करून एक मैत्रीचे नाते निर्माण केले आहे... आधी संस्कार मग साधने... या लेखात डॉक्टरांनी पालकांचे कान पकडले आहेत... हे पुस्तक पालक, मुले, स्त्रिया या सर्वांसाठीच लिहिलेले आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर सर्वांना सकारात्मकतेचा पाठ तर मिळेलच पण मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. पालक आणि मुले यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल. आजारांची सविस्तर माहिती मिळाल्याने भय दूर होईल. तरुणांमधील लैंगिक समस्यांचे न्यूनगंड दूर होईल. अशा अनेक दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहिले तर तुमच्या अज्ञात बुद्धीला हा एक सम्यक खुराक आहे. त्यामुळे तुमच्या विचारांना नक्कीच बळ मिळेल…