वाङ्मयीन क्षेत्रातल्या कोणत्याही गटातटाशी संबंधीत नसलेल्या आणि कोणत्याही पंथ वा मठाचे अनुयायी नसलेल्या डॉ. साहेब खंदारे यांचे आतापर्यंत सत्तावीस ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यात कविता, एकांकिका, चरित्र अशा लेखनाबरोबरच आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे संशोधन, साहित्य समीक्षा, लोकसाहित्याची मूलभूत आणि सैद्धांतिक मांडणी अशा संशोधन ग्रंथांचा समावेश आहे. डॉ. खंदारे यांच्या सर्वच प्रकारातील लेखनाचे आणि संशोधनाचे सुद्धा स्वतंत्र असे वेगळेपण आहे. हे वेगळेपण समजून त्यांची ग्रंथ संपदा मूळातून वाचावी लागेल. घेण्यासाठी
डॉ. साहेब खंदारे यांच्या कविता, एकांकिका, चरित्रग्रंथ यासह त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या साहित्य समीक्षेचा सांगोपांग विचार करून संशोधनाच्या शिस्तीत त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणारा हा ग्रंथ डॉ. विठ्ठल जीवतोडे यांनी साकारला आहे.