मराठी आत्मचरित्र आणि आत्मचरित्रपर कादंबरीला समृद्ध परंपरा आहे. अनेक
प्रतिभावंत लेखकांच्या कसदार लेखणीतून विलोभनीय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास
उलगडला गेला आहे. कुटुंब आणि समाजाप्रति असणारी आस्था, आपुलकी, आत्मीयता
आणि त्याबरोबरीने होणारी मनाची घुसमट, ताणतणाव, वादविवाद चित्रित करणारे
घटनाप्रसंग अशा कलाकृतींमधून वाचावयास मिळतात. १२ वी नापास असलेल्या पण
जीवनाच्या परीक्षेत चांगल्या 'गुणांनी' पास झालेल्या, एवढेच नव्हे तर क्लास मिळवलेल्या
'अनु-जया'ची ही अनोखी प्रेमकहाणी आहे. सामाजिक कार्याची आवड असणारा,
संवेदनशील वृत्तीचा जयवंत आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करणारी व मनमिळावू
स्वभावाची अनिता यांच्या अफलातून जमलेल्या जोडीची शृंगाररसपूर्ण जीवनकहाणी
वाचताना वाचक तृप्त व तल्लीन झाला नाही तरच नवल! रागाच्या भरात नवीन कपडे
फाडणे, घरात पाणी ओतणे, मोबाईल खलबत्त्यात घालून चुरा करणे असला कलंदरवृत्तीचा
नायक दुसऱ्या बाजूला दररोज सकाळी न चुकता बायकोच्या पाया पडतो! असं हे
जगावेगळं जोडपं आणि जगावेगळं प्रेम यात वाचायला मिळतं