डॉ. वेन डब्ल्यू. डायर हे स्वविकासाच्या क्षेत्रातील जगप्रसिद्ध असे लेखक आणि वक्ते आहेत. त्यांनी अनेक बेस्टसेलर पुस्तके लिहिली आहेत. त्याचप्रमाणे स्वविकासावरील असंख्य ऑडिओ आणि व्हिडीओ सीडीज्ची निर्मिती केली आहे. द टूडे शो आणि ओपेरासारखे टीव्ही व रेडिओवरील अनेक कार्यक्रमही त्यांनी केले.
डॉ. वेन डब्ल्यू. डायर
सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी फक्त दहाच गोष्टी कराव्या लागतील, असं म्हटलं तर जीवन किती साधं आणि सोपं होईल! तर मग त्या दहा गोष्टी तुम्हाला याच पुस्तकात मिळतील. जीवनातील समृद्ध अशा ज्ञान आणि अनुभवातून मिळालेली ही दहा रहस्ये डॉ. वेन डब्ल्यू, डायर यांनी सर्वांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळावे म्हणून पुस्तकरूपात देण्याचं ठरवलं.
ही दहा रहस्ये तुमच्या विचारांना एक नवीन दिशा देतील आणि जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतील. ही रहस्ये जशी लेखकाला उपयोगी पडली तशी तुमच्याही जीवनात उपयोगी पडतील. न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत या असामान्य पुस्तकाचा समावेश झाला आहे. जीवनातील प्रत्येक टप्प्याची सुरुवात करताना हे पुस्तक म्हणजे एक अद्वितीय अशी भेटच ठरते.