जीवनविद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री. वामनराव पै, सेवानिवृत्त डेप्युटी सेक्रेटरी, फायनान्स डिपार्टमेट, मंत्रालय, मुंबई, हे सन १९५२ पासून सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथ निर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादी द्वारा समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.
जीवनाकडे पहाण्याचा सामान्य लोकांचा दृष्टीकोन दैववादी, प्रारब्धवादी, नशीबवादी असा असतो. यशस्वी जीवन जगणे ही एक कला असून जीवन संगीताचे सात स्वर म्हणजेच जग, कुटुंब, शरीर, इंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन व परमात्मा माणसाला हाताळता आले तर त्याचे जीवन संगीतमय होते. सद्गुरू समजावतात की, माणसाचे भवितव्य बहुतांशी त्याच्याच हातात असते, कारण निसगनि माणसाला पूर्ण कर्म स्वातंत्र्य बहाल केले आहे आणि कर्म स्वातंत्र्याचा उपयोग करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते अन्य कोणीही नाही म्हणून "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार".