{"product_id":"vinod-gatha-mararthi-edition","title":"Vinod Gatha [Mararthi edition]","description":"ज्यांनी आयुष्याचा बरावाईट अनू कहगोड असा सर्व अनुभव घेतलेला आहे, ज्यांच्या अंतातून मानवजाती बद्दलच्या सहानुभूतीचा जिवंत झरा एकसारखा वाहतो आहे आणि सर्व मानवजात सुखी भाणि आनंदी व्हावी, अशी ज्यांच्या अंतःकरणाला रात्रंदिवस तळमळ लागून राहिलेली आहे, अशा उमदा आणि दिलदार माणसालाच आयुष्यांत विनोदाचा साक्षात्कार होतो. हलकट आणि लबाड माणसे ही कधीही विनोदी होऊ शकत नाहीत. देवादिकांनी समुद्र मंथन करून चौदा रत्ने बाहेर काढली. त्यांमध्ये त्यांना विनोदाचे रत्न कसे काय सापडले नाहीं ? जे देवादिकांना सापडले नाही, ते माणसाला मिळाले. संसारातल्या सर्व अनुभवांचे जो एकसारखे मंथन करीत राहातो, त्यालाच अखेर हे विनोदाचे रत्न सापडते. विनोदाचे हे महत्व लोकांना जेव्हा कळेल तेव्हांच त्यांना समजेल की, आपल्याला हसविणारा विनोदी लेखक हा बेड्यावाकड्या आणि वात्रट शब्दांच्या कोलांट्या उड्या मारणारा कोणी तरी उथळ आणि मूर्ख विद्रूपक नसून, तो मानवजातीचा सर्वात मोठा उपकारकर्ता आहे !","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Default Title","offer_id":44742209929473,"sku":"2XG59WUTD","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/efw.jpg?v=1712043127","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/vinod-gatha-mararthi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}