{"product_id":"seeds-or-terror-martrhi-edition","title":"seeds or terror [martrhi edition]","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसध्या आयसिस ही जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती असलेली दहशतवादी संघटना आहे. वेगवेगळे कर, तेल विक्री आणि अमली पदार्थाच्या व्यापारातून आयसिस दरमहा ८० दशलक्ष डॉलर्सची कमाई करते, असा अंदाज आहे. या उत्पन्नात एकटय़ा तेलक्षेत्राचा वाटा ४३ टक्के आहे. आयसिसप्रमाणेच प्रत्येक दहशतवादी संघटना स्वत:ची अर्थव्यवस्था तयार करते. धर्म आणि अफूची सांगड घालत तालिबान्यांनी अफगाणिस्तानला पोखरून टाकले आहे. अफूच्या शेतीतच अफगाणिस्तानातील दहशतवादाची बीजे रोवली गेल्याचे जळजळीत वास्तव ज्येष्ठ पत्रकार व लेखिका ग्रेचेन पीटर्स यांनी आपल्या ‘सीड्स ऑफ टेरर’ या पुस्तकाद्वारे अधोरेखित केले आहे. इंग्रजीतील हे पुस्तक अभिजित पेंढारकर यांनी मराठीत अनुवादित केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ‘एबीसी’ न्यूजसाठी काम केलेल्या ग्रेचेन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला वार्ताकनाचा बाज आहे. त्यात अफूच्या शेतीतून पोसला जाणारा तालिबानचा दहशतवाद आणि अमली पदार्थाचे जाळ्याचे भेदक चित्रण आहे.\u003c\/span\u003e","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270282801409,"sku":"2VCSWSPOH-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/574b76cf-07cc-4119-82e7-aaf62d1d4ac1.jpg?v=1699855340","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/seeds-or-terror-martrhi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}