{"product_id":"samikshamimansa-marathi","title":"SamikshaMimansa [MARATHI]","description":"\u003cp\u003eतत्त्वज्ञानाचे आणि सिद्धान्तांचे महत्त्वाचे कार्य कोणते? तत्त्वांची आणि संकल्पनांची निर्मिती करणे हे तत्त्वज्ञानाचे महत्त्वाचे कार्य असते, असे थोर तत्त्वज्ञ सांगतात. तत्त्वज्ञान एका अंगाने संकल्पनांची आणि ज्ञानव्यूहांची निर्मिती करते, त्यांची तर्कसंगत तपासणी आणि बांधणी करते, तर दुसऱ्या अंगाने ते जीवनाच्या आणि संस्कृतीच्या प्रत्यक्ष व्यवहारात त्या संकल्पना, ज्ञानव्यूह कृतिशील कसे होतात व होतील, याचा व्यवहारी दृष्टीतून विचार करते... संकल्पनांमागील ही सर्जक 'तत्त्वशीलता' आणि 'कृतिशीलता' यांची जपणूक करणे, हे तत्त्वज्ञानाचे व सिद्धान्तांचे महत्त्वाचे कार्य असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतत्त्वज्ञानाचे हे कार्य साहित्यमीमांसा आणि समीक्षामीमांसा यांच्या दृष्टीने फार मोलाचे वाटते. भारतीय साहित्यशास्त्राच्या परंपरेत 'स्फोटतत्त्व', 'शब्दतत्त्व' आणि 'काव्यतत्त्व' ही सर्जनाची केंद्रे मानली जातात. म्हणून समीक्षामीमांसेच्या संदर्भात सिद्धान्तनामागील 'तत्त्वशीलता' आणि 'कृतिशीलता' ही महत्त्वाची वाटतात. कारण समीक्षेलाही दोन अंगे असतात : एक सर्जनशील असे 'तत्त्वशील' अंग असते. तसेच तिला 'कृतिशील' असे दुसरे अंग असते. या दोन अंगांमिळून समीक्षेचा क्रियाव्यापार आणि व्यवहार सिद्ध होत असतो. म्हणून तिच्या 'सिद्धान्तन' आणि 'समीक्षण' या दोन्ही अंगांचे सर्जन आणि संवर्धन कसे होईल, या गोष्टीची काळजी साहित्याच्या अभ्यासकांनी, वाचक-समीक्षकांनी, विद्यार्थिवर्ग आणि शिक्षक-प्राध्यापकवर्ग अशा सर्वांनी घेतली पाहिजे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- प्रस्तावनतून\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45702337233153,"sku":"325KRMBY9-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_be8f0b09-4386-42c5-b719-ba3f6233ee07.jpg?v=1730184007","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/samikshamimansa-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}