{"product_id":"rasagandha-aswadak-sameeksha","title":"Rasagandha - Aswadak Sameeksha [Marathi edition]","description":"लेखक-दिग्दर्शक-निर्माता-अभिनेता-चित्रकार, अशा अनेक रूपांतून, साहित्य, रंगभूमी, चित्रपट इत्यादी क्षेत्रांमध्ये चौफेर संचार करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांनी, काही जागतिक महत्त्वाच्या कलाकृतींची आस्वादक समीक्षा, 'रस गंध' या लेखसंग्रहात केलेली आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअतिशय खानदानी भाषेत केलेल्या या रसाळ समीक्षेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यामागची तळमळयुक्त सामाजिक जाणीव ! जुने उत्कृष्ट मराठी चित्रपट लुप्त होत चालल्याची खंत व्यक्त करतानाच, त्यांना वाचवण्यासाठी काय करता येईल, याची विधायक योजना ते देतात. दलित चळवळ ही डॉ. आंबेडकरांच्या मूळ हेतूपासून दूर जातेय, याविषयी ते चिंता करतात, तसेच रवींद्र नाट्यगृहाच्या भिंतीवरचे, गोपाळराव देऊसकरांनी रंगवलेले भव्य भित्तिचित्र, नष्ट होण्यापासून कां वाचू शकले नाही, याचाही जाब संबंधितांना विचारतात. यामुळे 'रस-गंध' हे केवळ कलाकृतीचे रसग्रहण करणारे पुस्तक न राहता ती, अनेक, महत्त्वाचे सांस्कृतिक प्रश्न उपस्थित करणारी साहित्यकृती ठरते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eगेल्या अर्धशतकात मतकरींनी वेळोवेळी लिहिलेले हे लेख स्थळकाळाच्या पलिकडे जाणारे म्हणूनच आजही ताजेतवाने वाटणारे आहेत, कलाकृतीचा, अभ्यासपूर्ण आणि रसिकतासंपन्न आस्वाद कसा घ्यावा, याचा वस्तुपाठ म्हणावे, असे हे पुस्तक अभ्यासूंना निश्चितच उपयोगी पडेल. अनेक कारणांसाठी, हा समीक्षाग्रंथ मराठी साहित्यात विरळा ठरावा, असा आहे.","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44810154017025,"sku":"2XPTNDJWH-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/wal.jpg?v=1712630530","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/rasagandha-aswadak-sameeksha","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}