{"product_id":"ola-canvas-marathi-eidition","title":"Ola Canvas [marathi eidition]","description":"एका मध्यमवर्गीय मराठी तरुणाने जे. जे. त प्रवेश करणं म्हणजे एक दिव्यच असतं, पण कलेची आस आणि आपल्याला काही तरी करून दाखवायचं आहे, ही जिद्द असली तर अनेक अडचणींवर मात करून नाव मिळवता येतं, हे म्हापसेकारांनी कुठलाही उपदेशाचा अभिनिवेश न आणता आपल्या सहज शैलीत मांडलं आहे. या पुस्तकातले लेख वाचताना त्यातील लेखकाचा प्रामाणिकपणा भावतो. या प्रामाणिक लिखाणामुळे वाचकांना खिळवून ठेवण्यात पुस्तकाला यश मिळेल. कुठलाही आडपडदा न ठेवता किंवा मोठेपणाचा आव न आणता आपल्या भोवतालची परिस्थिती, त्यात नोकरी सांभाळून मिळवलेले जे. जे. तले अनुभव तटस्थपणे म्हापसेकरांनी वाचकांसमोर मांडले आहेत. बाळासाहेब ठाकरे, लक्ष्मण, राज ठाकरे, डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांबाबत बोलतानाच, ते स्वतःचं व्यंगचित्र आणि त्यामागची भूमिका सहज सांगून जातात. 'माझ्या व्यंगचित्रांचा कल वैचारिक तेकडे असायचा. त्यात शब्द जवळ जवळ नसायचेथ!' केवळ ब्रशचे फटकारे आणि काही रेषा यांच्या माध्यमातून विचार भावना व्यक्त करायच्या आणि त्याही सर्वसामान्यांना समजतील अशा पद्धतीने हे आव्हान फार मोठं आहे. रेल्वे लोकल ही शहराच्या जीवनाचा अविभाज्य भाग कामानिमित्त सतत प्रवास करणाच्या म्हापसेकारांनी मुंबईच्या जीवनाची रूपरेषाच आपल्यासमोर ठेवली आहे आणि अनेक जीवघेण्या प्रसंगांचं अलिप्तपणे वर्णन केलं आहे. लिहिता लिहिता त्यांनी अनेक व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत. एम. एफ. हुसेन, अमिताभ बच्चन, नामदेव ढसाळ असोत; की दादरचा बबन चहावाला, संपादकाची सेक्रे टी, ऑफिसातील दीपिका 'या मैत्रिणी त्यांच्याबद्दल शब्दचित्र काढलं आहे. व्यक्तीप्रमाणेच मुंबईतून हद्दपार झालेली मेरवान कॅफेसारखी इराण्यांची हॉटेल्स, जुन्या चाळी, बंद झालेल्या गिरण्या, बदललेला लालबाग-परळचा चेहरा, वसई- विरार, नवी मुंबई पलीकडे वाहत गेलेली मुंबई, वांचाही उलेख अनेक\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eलेखांत येतो आणि 'ओला कॅनव्हास' यातील लेख केवळ लेखकाचा अनुभव न\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eराहता त्याअनुषंगाने मुंबई शहराचं व्यक्तिमत्वच आपल्यासमोर उभं करतात.","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270290338049,"sku":"2VA7SQ1A9-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/51fFiwMi_jL._SY425.jpg?v=1699342978","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/ola-canvas-marathi-eidition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}