{"product_id":"mazi-matchal-metcof-house-te-rajbhavan-marathi","title":"Mazi matchal metcof house te rajbhavan [marathi]","description":"\u003cp\u003eप्रशासकीय किंवा सनदी अधिकाऱ्याचा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असतो. बुद्धिकौशल्य, नेतृत्वगुण, प्रसंगावधान, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, सचोटी, वक्तशीरपणा, कार्यक्षमता, कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची आणि कष्ट करण्याची तयारी, सहनशीलता, बिकट परिस्थितीतही कणखर राहण्याची वृत्ती इ. गुण सनदी अधिकाऱ्याकडे असणे अपेक्षित असते. अशाच गुणांचा समुच्चय असलेले माजी सनदी अधिकारी आणि अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं आत्मचरित्र आहे 'माझी वाटचाल मेटकॉफ हाउस ते राजभवन (१९५२-१९८९)'. या आत्मचरित्रातून त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनातील अनुभव कथन केले आहेत. १९५२ ते १९८९ म्हणजे जवळ जवळ सदोतीस वर्षांच्या कालखंडातील हे अनुभव आहेत. त्यांचा जन्म, शिक्षण, आय. ए. एस. चं प्रशिक्षण, नोकरीची सुरुवात ते सेवानिवृत्तीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांनी सांगितला आहे. एक कुशल सनदी अधिकारी म्हणून त्यांचा हा अनुभवपट अतिशय विस्तृत आहे.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45518669807873,"sku":"31EWXV2TD-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/HJH_fc2875d3-27a8-4bac-9165-7471325d41cf.jpg?v=1723880374","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/mazi-matchal-metcof-house-te-rajbhavan-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}