{"product_id":"kasa-mi-asa-mi-p-l-deshapande-marathi","title":"Kasa Mi ... Asa Mi... P.L. Deshapande [MARATHI]","description":"\u003cp\u003e\/\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"कुण्या विद्वान टीकाकारानं विडंबनाला बिनभांडवली धंदा म्हटलं आहे. मला ते पटत नाही. जीवनाची चांगली ओळख असल्याखेरीज विडंबन करता येत नाही. शब्दांच्या बुरख्याआड दडलेलं पांडित्य शोधायला डोळ्यांत सामर्थ्य लागतं, व्यक्तिगत द्वेषभावनेच्या पलीकडे जावं लागतं आणि जीवनातल्या साऱ्या धडपडींवर, साऱ्याच मानवी व्यापारांवर खूप प्रेम असावं लागतं, मनात करुणेचा झरा वाहावा लागतो; तरच विनोदी लिखाण संभवतं.... मी केवळ विडंबनंच लिहिली नाहीत; 'संगीत चिवडामणी', 'अण्णा, वडगांवकर', 'बोलट', 'लखू रिसबूड', 'प्रा. विश्व अश्व शब्दे' अशी काही विनोदी व्यक्तिचित्रंही लिहिली. इथेदेखील सारख्या चेहेऱ्यांच्या अनेक मंडळींतून मी एक नवा चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त एक व्यक्ती डोळ्यांपुढे ठेवून यांत्रिक फोटो काढता येईल, पण स्वतंत्र जिवंत चित्र काढता येणार नाही. आणि ललित साहित्य हे हुबेहूब चित्र काढणाऱ्या फोटोग्राफीसारखं नाही. केवळ प्रतिकृती म्हणजे साहित्य नाही. ती 'कृती' आहे, प्रतिकृती नाही. आणि विनोदी लिखाणही त्याला अपवाद नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"माझ्या विनोदी लेखनाची कथा ही अशी आहे. त्यातल्या प्रयोगांचा पत्ता मला नीट लागलेला नाही. वास्तविक हे कार्य माझं आहे असं मला वाटत नाही. स्वयंपाक्यानं पदार्थ करावेत, आरोग्यशास्त्राशी त्याला काय कर्तव्य आहे? साहित्यातदेखील चिजा बनवणारी मंडळी आम्ही, रस पंडितांनी जाणावा. गद्य विडंबनाच्या आणि अन्य विनोदी चिजा बनवणारा लहानसा कारागीर म्हणून मी एवढी खबरदारी मात्र घेतो की, हातात धरलेल्यांची गुळगुळीत व्हावी, मात्र जखम अजिबात होऊ नये.\"\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45790921654529,"sku":"32F5UKD1D-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_459d21c5-a681-42e5-9d9a-05f916993e5c.jpg?v=1732605767","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/kasa-mi-asa-mi-p-l-deshapande-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}