{"product_id":"dona-dhruva-marathi-edition","title":"dona dhruva [Marathi edition]","description":"कैफियत\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eदहा बर्षे ।\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eलेखकाची कैफियत म्हणून दोन शब्द लिहावेत या दृष्टीने मी 'दोन भुब' चाकू लागलो तेव्हा मी ही कादंबरी लिहित्याला दहा वर्षे झाली हे क्षणभर मला खरेच बाटेना! या कादंबरीतली पात्रे या नाही त्या रुपाने माझ्याभोवती अद्यापीही विपुलतेने वावरत असताना, तिच्यातला कूटअक्ष पूर्वादतक्याच कठीणपणाने आणि बेदरकारपणाने समाजाच्या सहानुभूतीला आणि कर्तृत्वाला आव्हान देत असताना, मध्ये दहा पावसाळे आले आणि गेले हे मला खरे तरी कसे बाटाये ? सात वर्षांनी मनुष्याच्या शरीरातला कण नि कण बदलतो असे शास्त्रज्ञ म्हणतात पण या विराट भारतीय समाजपुरुषाचे शरीर मात्र या शास्त्रनियमाला अपवाद आहे. शेकडो किंबहुना हजारो वर्षे आली आणि गेली पण अंगावर केबदेही बारुळ बाढले तरी त्याची शुद्धी नसलेल्या एखाद्या तपस्व्याप्रमाणे हा समाजपुरुष एका जागी जसाच्या तसा बसून राहिला आहे. अंतर एवढेच की तसले तपस्वी उम्र तपाल मग्न असतात आणि हा समाजपुरुष मात्र कुंभकर्णाप्रमाणे दीर्घ निद्रेच्या आधीन झाला आहे. अशा स्थितीत अवध्या दहा वर्षांनी त्याच्यात काही विशेष बदल झालेला दिसाबा अशी अपेक्षा करणे हे कदाचित वेडेपणाचेच लक्षण ठरेल ।\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआणखीही एका दृष्टीने ही कादंबरी मी नुकतीच लिहिली की काय असा विचित्र भास मला वारंवार होतो ! अनेकदा संध्याकाळी काम संपवून श्रोत होऊन गेल्यावर माझ्या डोळ्यांपुढे शिरोडे-आरवलीची ती आवडती टेकडी उभी राहते. टेकडीच्या पलीकडचे उन्हाळ्यात कमळांनी फुलणारे ते तळे जणू काही आपल्या हसऱ्या डोळ्यांनी मला हाका मारीत आहे अशी कल्पना माझ्या मनात येते. धामापूरच्या","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44810515218689,"sku":"2XPUV9SSH-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/jl.jpg?v=1712632638","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/dona-dhruva-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}