{"product_id":"churchbell-marathi","title":"Churchbell [marathi]","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'चर्चबेल' या संग्रहात आत्मपर आशय असलेले आणि तरीही भावमधुर काव्याची प्रचीती आणून देणारे पस्तीस ललित लेख आहेत. ग्रेसमधला आत्ममग्न, आत्मसन्मुख कवी इथे गद्यातून वाचकांसमोर साकार होताना कवितेचे सर्व विशेष तितक्याच उत्कटतेने, तितक्याच समर्थतेने प्रकट करतो. तुकयाच्या अभंगवाणीवर पोसलेले, रोशनच्या गाण्यांनी समृद्ध झालेले, हॉस्पिटलमधील प्रदीर्घ वास्तव्याने मृत्युविषयी अधिक प्रगल्भ विचार करणारे, माणसामाणसांतील स्वभाववैचित्र्यावर व व्यक्तिवैशिष्ट्यांवर लोभावून जाणारे, झाडे आणि घोडे यांच्यामुळे वेडावलेले ग्रेसचे कविमन आणि त्याचे समृद्ध भावविश्व इथे रसिकांपुढे एखाद्या स्वच्छ, नितळ, पारदर्शक जलाशयासारखे पसरलेले आहे. ग्रेसच्या काव्यातील आशयघन दुर्बोधता 'चर्चबेल'मधील ललितसुगम शैलीमुळे आणि आत्मपर संदर्भांमुळे लगेच सुबोध होऊन जाते. म्हणूनच 'कवी' ग्रेसचा अभ्यास करताना कुणालाही 'चर्चबेल' हाती धरवेच लागेल. ग्रेसचे ललितलेखनही त्यांच्या कवितेइतकेच लोभस आहे हे कुणालाही नाकबूल करता येणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45694500012289,"sku":"324HUJNR5-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_e442ca3e-ac3c-4852-88f5-cfe1a50f7c08.jpg?v=1729832766","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/churchbell-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}