{"product_id":"bhoomi-marathi-edition","title":"Bhoomi [Marathi edition]","description":"ही आहे मैथिलीची भूमी. वाल्मीकींनी जिला मर्यादापुरुषोत्तम रामाच्या पुरुषी संकुचित दृष्टीतून रेखली, त्या मर्यादेतच अडकून न राहणाऱ्या अशा एका आधुनिक मैथिलीची.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eवडिलांच्या मृत्यूनंतर तामिळी ख्रिश्चन आईच्या संस्कारांत वाढलेली, समुद्रकिनारी वसलेल्या लहानशा गावातली ही मैथिली. तिचं आयुष्य आईच्या मृत्यूनंतर मुंबईत आत्याकडे आल्यावर अनेक वळणांतून सरकत राहतं. पण आयुष्यातला प्रत्येक अनुभव तिला तिच्यातील अंतःस्थ स्वत्वाची जाणीव देत, कधी त्याच्याशीही संघर्ष करत घडवत नेतो-एका अनाथ, हट्टी मुलीचं एका बुद्धिवान, समंजस नि आत्मसामर्थ्याच्या बळावर आयुष्याला समजून घेणाऱ्या एका प्रगल्भ स्त्रीमध्ये रूपांतर करत. स्वतःमधल्या सर्जकशक्तीनं स्वतःला उजळत नेणाऱ्या या मैथिलीच्या भूमीचे हे पाझर म्हणजे तिच्या स्वत्वाचेही हुंकार\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआशा बगे मराठी साहित्यक्षेत्रात अनेक वर्ष स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या लेखिकांमधील एक ठळक नाव. 'झुंबर', 'त्रिदल', 'सेतू' अशा अविस्मरणीय कादंबऱ्यांनंतरची त्यांची ही कादंबरी.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eएकीकडे पारंपरिकतेशी नाळ न तोडताही आधुनिक जीवन-विचारसरणीला सामोरं जाता येतं... हे वैशिष्ट्य जाणवून देणारं आशा बगे यांचं लेखन. नागपूरसारख्या शहरातील वास्तव्यामुळं वैदर्भीय भाषेचा आंतरिक गोडवा त्यांच्या भाषेत झिरपलेला जाणवतो. अनेक पातळ्यांवरून सांधत, विस्कळत जाणारी मानवी भाववंधांची उत्कट, जिवंत स्पंदनं हा त्यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष. या वैशिष्ट्यांनी साकारलेली ही 'भूमी', अंतर्मुखतेचाही एक दुर्मीळ आनंद वाचकांना प्रदान करत राहते.","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270255702273,"sku":"2VH5JBZSX-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/bhumi.jpg?v=1700545765","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/bhoomi-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}