{"product_id":"apli-sansad-marathi","title":"Apli Sansad [Marathi]","description":"\u003cp\u003eआपली संसद या पुस्तकात आपल्या संसदेबद्दलची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अत्यंत साध्या व सरळ शैलीत दिली आहे. आपली संसद अस्तित्वात कशी आली, तिचा विकास कसा होत गेला, तिचे मुख्य कार्य कोणते व ती ते कसे पार पाडते, संसदेचे सदस्य कसे निवडले जाता आणि संसदेमुळे देशात कायद्याचे राज्य कसे नांदू शकते इत्यादी प्रश्नांची उत्तरे या महत्त्वपूर्ण पुस्तकात्त आपल्याला मिळतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. सुभाष सी. कश्यप यांचा संसदेशी फार निकटचा संबंध राहिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९८४-१९९० या कालावधीत ते लोकसभा सचिवालयाचे महासचिव होते. त्या अगोदर जिनिव्हा येथे झालेल्या आंतरसंसदीय संघाच्या अधिवेशनात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे ते प्रमुख होते. त्यापूर्वी ते 'इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अँड पार्लमेंटरी स्टडीज' या आणि 'ब्यूरो ऑफ पार्लमेंटरी स्टडीज अँड ट्रेनिंग' या संस्थांचे संचालक होते. डॉ. कश्यप सध्या 'सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च' या संस्थेत मानद अभ्यागत प्राध्यापक तसेच अधिवक्ता आहेत. 'पंचायत राज'च्या संबंधातही ते भारत सरकारचे मानद सल्लागार आहेत. डॉ. कश्यप यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक संशोधनपर निबंध, लेख व अंदाजे ५० मूळ पुस्तके आणि जवळपास ५० संपादित ग्रंथ प्रकाशित केले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45917811671297,"sku":"32NTDVCAP-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_200d9e28-5c3e-436d-a62a-5defdb9a9f56.jpg?v=1735557242","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/apli-sansad-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}